गझल : रवीन्द्र जवादे

 






माणसाला माणसाचा वाव ठेवा 

माणसातच देव आहे,भाव ठेवा.


ओळखीचा वा अनोखा भेटणारा

स्वागताला काळजाचे गाव ठेवा 


संकटी वा काळजीच्या जो किनारी

सावराया हात देण्या, धाव ठेवा.


रे किनारे सोडले की काय भीती?

लाटवेडी कापणारी नाव ठेवा !


का सुखासाठीच सारा खेळ चाले?

दुःख-वेडा देखणासा घाव ठेवा

...................................................


No comments:

Post a Comment