१.
मला आणखी काय पाहिजे
आधाराला माय पाहिजे
त्या गोठ्याला किंमत नाही
हंबरणारी गाय पाहिजे
दूध भलेही पातळ ठेवा
देखाव्याला साय पाहिजे
सन्मानाने माथा टेकू
शुद्ध गुरूचा पाय पाहिजे
फुकट प्रेयसी त्रास एवढा
नेहमी वायफाय पाहिजे
आईच्या साडीला गाठी
तरी मुलाला टाय पाहिजे
मुलगी जेव्हा सोडुन जातो
पापा,टाटा , बाय पाहिजे
२.
बघ चिमणीचा खोपा दिसतो
अवती भवती धोका दिसतो
कसे मुलीचे लग्न करू मी
मला सारखा झोका दिसतो
कामाचा उंदीर धावतो
साहेबाचा बोका दिसतो
घड्याळातले काटे काढा
मला नेहमी ठोका दिसतो
रोज मुलांचे अंगण रडते
स्मार्ट फोनचा धोका दिसतो
गरीबालाच मोतीबिंदू
श्रीमंताला खोका दिसतो
...................................................
