Showing posts with label सुरेश भटांच्या उर्दू गझलांच्या वृत्तांतील लवचिकता : हेमंत पुणेकर. Show all posts
Showing posts with label सुरेश भटांच्या उर्दू गझलांच्या वृत्तांतील लवचिकता : हेमंत पुणेकर. Show all posts

सुरेश भटांच्या उर्दू गझलांच्या वृत्तांतील लवचिकता : हेमंत पुणेकर




माधव जूलियन यांनी जरी मराठीत गझल आणली तरी तिचा वाजत गाजत प्रवेश करून द्यायचे श्रेय सुरेश भटांना जाते. सुरेश भटांनी सात गझला आणि तीन रुबाया उर्दूत रचल्या आहेत. 

प्रदीप निफाडकर यांच्या 'सुरेश भट आणि मी' या पुस्तकात त्यांचा समावेश आहे. त्यातील क्र. ३, ४ आणि ६ ह्या गझलांखाली कंसात त्यांचा लेखनकाल नमूद केलेला आहे. इतर गझलांखाली नमूद केलेला नसला तरी त्याच काळातल्या म्हणजे १९७९ ते ८३ ह्याच कालखंडातल्या त्या आहेत.


उर्दू गझलेत शब्दांचे वजन ठरवताना एकाक्षरी गुरू शब्द किंवा शब्दांती येणाऱ्या अक्षरे गुरू असल्यास म्हणजेच ते अक्षर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ या स्वराने युक्त असेल तर त्या गुरू अक्षरांना वृत्तात गुरू आणि मात्रा घटवून लघू म्हणूनही घेता येते. याला उर्दू अरुज म्हणजे छंदशास्त्रात 'मात्रा गिराना' असे म्हणतात. माधव जूलियन यांनी तर याला 'शैथिल्य' म्हटले आहे आणि फारसी गझलकारांना उद्देशून चार पानाची एक नोंद इंग्रजीत लिहिली असा उल्लेख 'छंदोरचना' पुस्तकात आढळतो. पण ती नोंद उपलब्ध होऊ शकली नाही. भटांनी उर्दू गझलेत 'मात्रा गिराना' ही सूट बऱ्यापैकी घेतली; पण मराठीत मात्र त्यांनी ही सूट घेतली नाही. किंवा तसा साधा उल्लेखही 'गझलेची बाराखडी'त केला नाही. तसा उल्लेख करून स्वतःच्या मराठी गझल लेखनात त्याचा अवलंब केला असता तर मराठी गझलचे चित्र निश्चित वेगळे राहिले असते. अक्षरगणवृत्तातील गझला अधिक सहज झाल्या असत्या आणि गझलकारांना शब्द निवडीला व्यापक वाव मिळाला असता असे या लेखकाला नम्रपणे वाटते. वृत्ताचा असा लवचिक वापर मराठीतही व्हायला हवा. ज्यामुळे अक्षरगणवृत्तात गझल रचणे सुकर होईल आणि सध्याच्या मात्रावृत्तांकडे झुकणाऱ्या मराठी गझलेला अक्षरगणवृत्तातील लगक्रमातून सिद्ध होणाऱ्या लयीकडे परत आणता येईल. 

या अभ्यासात सुरेश भटांच्या सात उर्दू गझलाच घेतल्या आहेत. त्यांची वृत्ते आणि जिथे मात्रा गिराना आणि अन्य सुटी घेतल्या आहेत तिथे खाली दाखवल्याप्रमाणे चिन्ह दिले आहेत. 


१. स्वरांत (आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ या स्वरात संपणारा) गुरू अक्षर सुटे किंवा शब्दांती येत असेल तर त्याची एक मात्रा कमी करून ते लघू म्हणून घेता येते. भटांच्या खालील गझलेत हे अक्षर 

* चिन्हाने दाखवले आहे. 


२.उर्दूत मेरा, तेरा, कोई अशा बोलण्यात वारंवार येणाऱ्या शब्दांच्या पहिल्या अक्षराची मात्रा कमी करून ते गुरू अक्षर वृत्तातल्या लगावलीच्या निकडीनुसार लघू म्हणूनही घेतात. भटांच्या खालील गझलेत हे अक्षर * चिह्नाने दाखवले आहे.


३.ओळीच्या शेवटी येणाऱ्या लघू अक्षराच्या मात्रेचा लोप करून ती मात्रा धरली जात नाही. भटांच्या खालील गझलेत हे अक्षर @ चिन्हाने दाखवले आहे.


४.एका ओळीत 'लोग हुए ' चा 'लोग्हुए' असा उच्चार करून गालगा म्हणून घेतले आहे. अकारांत लघू अक्षरानंतर स्वराने किंवा 'ह' ने सुरू होणारे अक्षर येत असल्यास असा संयोग करता येतो. ज्याला स्वरसंधी म्हणतात.


सात गझला -


१. वृत्त : विधाता

लगावली :

गागागागा गागागा x २


बुझ गये याद के शोले सदियोंसे* जलनेवाले 

थम चुके कारवाँ दिल से बरसों से* चलनेवाले 


क्यों उठा है मुद्दत से आशोब (गोंधळ) शहर में इतना

क्यों रोने लगें हैं फिरसे मिरी कत्ल पे* हँसनेवाले


आबाद यहाँ की बस्ती शायदही* कभी तो होगी

थे जिदाँ कब मुर्दे, बेकार सिसकनेवाले


ना समझा कोई अबतक दुनिया के अंधे रास्ते

बिन देखे दुनियादारी करते है करनेवाले


मासूम जवानी मेरी कर गयी मुखातिब (उद्देशून ) उनको

सोचते रहे शिद्दतसे दानिशवर (कठोरपणे, हुशार ) सुननेवाले


कुदरतका खेल तमाशा जो हुआ था* होनेवाला 

हड़बड़ा गये हैं लेकिन क्यों पर्दे* गिरनेवाले

मंजूर कभी था उनको शेरोंसे रिश्ता मेरा 

गर कहता बाकी है तो कह देंगे कहनेवाले


२. वृत्त : वैशाख

लगावली :


गागाल गालगा लल गागाल गालगा


इतना ही* अपनी* मौत पे* बस माजरा हुआ 

बोले वो* मुस्कुराके* बहुत ही बुरा हुआ


मेरे लिये न चांद, न तारे, न चांदनी

अपना तो धूप ही में* पसीना हरा हुआ


आया न मेरे* हाथ कभी जिन्दगी का हाथ@ 

वो था मे^रा ही हाथ जो* निकला धरा हुआ


पहचानता हूँ रंग मैं* साकी शराब का

तेरा चषक है* मेरे* लहू से भरा हुआ


साहब जरुर आपने* लूटा बहार को

है फूल फूल यहाँ का डरा हुआ 


जागो के* देखते हैं* सभी लोग हु”ए सहर 

सूरज पडा हुआ है* सडक पर मरा हुआ


३. वृत्त : मंजुघोषा

लगावली : गालगागा x ३


टूट कर चेहरे(गागा) सभी बिखरे हुए हैं 

आइने फिर क्यों सजे-संवरे हुए हैं


अब न बस्ती में रहा कोई बखेड़ा

चीखते थे जो वो*ही बहरे हुए हैं


हर दिशा दीवार बनती जा रही है।

रास्ते मुंह फेर कर मुकरे हुए हैं


जोखते (जोखणे) हैं बार अब युगप्रश्न किस की ? 

उत्तरों के काफिले गुजरे हुए हैं


ज़िन्दगी आकर यहाँ ताने न देगी 

हम समय के छोर पर ठहरे हुए हैं


आप क्यों परिचय हमारा पूछते हैं ? 

हम तो* अपना नाम तक बिसरे हुए हैं


(२१.३.७९)


४. वृत्त : लज्जिता 

लगावली :

गालगा गालगा 

लगागागा/गाललगा


जानता हूँ मे*रा भला होगा

मेरा* हर दोस्त दोगला (अकुलीन) होगा


फिर पड़ौसी ने* दी मुझे गाली 

आपसी यह भी* मामला होगा


लो, अचानक वो* हो गए गूँगे

उनको* मेरा पता चला होगा


मैं न होता तो* कुछ न वो कहते 

मेरा* होना उन्हें खला होगा


यूँ न जल्लाद की उठी तलवार

विप्लवी (बंडखोर) ही उतावला होगा


ये जो* हँस-हँस के* बाते* करता है। 

कोई* प्राचीन दिलजला होगा


क्या भला फैसला करेंगे आप@ 

आप का भी तो* फैसला होगा


आँसुओंसे हमारा* बैर नही (गाललगा)

सांत्वनासे मुकाबला होगा


अपनी* मंज़िल करीब है यारो 

यानी* कुछ और फासला होगा


दूर सावन सहम खड़ा है* मगर... (गाललगा) 

कोई* बादल तो* मनचला होगा


जिन की* आँखों में* आज हैं आँसू 

उनके ओठोपे* ज़लज़ला (भूकंप ) होगा


इसलिए सो रहे हैं* हम शायद 

दिनदहाडेही* दिन ढला होगा


(२९ नवम्बर ८२)


५. वृत्त :  वियद्गंगा

लगावली : लगागागा x ४


कटे है सर बहुत फिर भी हमारा सर तो* बाकी है। 

अगर उजडे हैं* घर लाखो, हमारा घर तो* बाकी है।


भला दो चार लाशोंसे कहीं इतिहास बदला है 

हरावल (ठगपुढारी) कूच कर बैठा, मगर संगर तो* बाकी है।


चिताएँ बुझ गई सारी धुआँ उठता नहीं लेकिन 

अभी जल्लाद के मन में हमारा डर तो* बाकी है


न आये झूम कर सावन, न फिर काली घटा छाये

हमारे वासते माटी लहूसे तर तो* बाकी है 


हुई कब रात ? यह लाचार सूरज का अंधेरा है 

उठो, वह एक नन्ही सी किरण पथपर तो* बाकी है


६. वृत्त : रंगराग


गालगा लगागागा x २ 


प्यार के इशारों की बात हम नहीं करते 

धूप में सितारों की बात हम नहीं करते


देखिए तो* दरवाजा कौन खटखटाता है? 

अजनबी बयारों (झुळूक) की बात हम नहीं करते


यूँ तो* वक्त के आँसू पोंछते हैं* हम फिर भी

दर्द के इज़ारों (ठेकेदार) की बात हम नहीं करते


आने*वाली* दुनिया का हौसला स्वयं हम हैं

कागजी सहारों की बात हम नहीं करते


आप क्यों नही सुनते आसपास की चीखें ! 

दूर की पुकारों की बात हम नहीं करते


हम हैं* चंद मुसकाने बदनसीब लोगों की

सिर्फ गम के* मारों की बात हम नहीं करते


जेठ में पसीने से तरबतर हैं* हम फिर भी

छाँव के दुलारों की बात हम नहीं करते


घाव हैं हरे अबतक, ज़हर भी नहीं उतरा...

भूलकर भी* यारों की बात हम नहीं करते 


अब तो* अपने* आँचल में हम ने* भर लिए काँटे 

आजकल बहारों की बात हम नहीं करते


हम ही* कल के* सूरज की पालकी उठाऐंगे 

इन थके कहारों की बात हम नहीं करते


(९.५.८३)


७. वृत्त : वियद्गंगा 

लगावली :

लगागागा x ४ 


जगत की रीत बदली है, मे*रा अंतर नही बदला 

समय का प्रश्न बदला है, मे*रा उत्तर नही बदला 


भला क्या यूँ बदलकर मेरा* जीवनग्रंथ बदलेगा ?

कि जिस का आजतक तात्पर्य क्या, अक्षर नही बदला


स्वयं बदले तो* बदलो, क्यों मुझे, उपदेश देते हो ?

 को*ई बाहर नहीं बदला को*ई भीतर नहीं बदला


कभी चलते हुए चरणों ने* पथ का रूप बदला है

मनुज की चाल बदली है, कभी ईश्वर नही बदला 


लहू में आग ऐसी है की* दम लेने नही देती

मे*री तलवार बदली है- मे*रा संगर नही बदला ।


मे*री साँसो में* डूबा है विजन का शुष्क सन्नाटा

परन्तु गुनगुनाने का मे*रा तेवर नही बदला 


इधर मैं हाथ में सूरज उठाकर आज चलता हूँ 

उधर कुछ लोग रोते हैं कि यह अंबर नही बदला


तुम्हारे हाथ की मेहंदी से* मत पूछो वही मैं हूँ

वही हूँ, जिस के* पतझड में बसंती स्वर नही बदला


.............................................

अधिक माहितीसाठी जिज्ञांसूनी आधीच्या अंकातील खालील पोस्ट

अवश्य वाचाव्यात.


१.

गझलकार सीमोल्लंघन २०२३ - 

लवचिक वृत्तातल्या तीन गझला : हेमंत पुणेकर


२.

गझलकार सीमोल्लंघन २०२२ -

गझल ‘लिहिणे’ बंद करा ! : हेमंत पुणेकर


३.गझलकार सीमोल्लंघन २०२१ -

दोन गझला : हेमंत पुणेकर


४.

गझलकार सीमोल्लंघन  २०२३ -

गणवृत्तांना लवचिक करण्याची गुरुकिल्ली : उच्चारी वजन : हेमंत पुणेकर


५.

गझलकार सीमोल्लंघन २०१९ - 

मराठी आणि गुजराती गझलेच्या विकासावर एक तुलनात्मक नोंद : हेमंत पुणेकर


६.

गझलकार सीमोल्लंघन २०१८-

हेमंत पुणेकर : उच्चारी वजनातल्या सहा गझला


७.

गझलकार सीमोल्लंघन २०१८-

गझलांच्या वृत्तातली लवचिकता : श्रीकृष्ण राऊत


....................................................