Showing posts with label तुकाराम पुंडलिक खिल्लारे. Show all posts
Showing posts with label तुकाराम पुंडलिक खिल्लारे. Show all posts

गझल : तुकाराम पुंडलिक खिल्लारे

 




चाले धडपड पोटासाठी

गुळाभोवती जमली दाटी


टपून बसती बगळ्यावाणी

राबेल कोण कोणासाठी?


येती-जाती गडबड नुसती

पडे भिकारी रस्त्याकाठी


गल्लोगल्ली शहरोशहरी 

ज्याची त्याची बंद कुपाटी 


किती आर्जवे ओढ किती ही

जाळ्यात कुणी येण्यासाठी !


'तुकाराम' जर समाजसेवी

बघा जमवतो पैसा गाठी

....................................................