Showing posts with label सुधाकर झिंगाडे. Show all posts
Showing posts with label सुधाकर झिंगाडे. Show all posts

गझल : सुधाकर झिंगाडे





भाव माझा नम्र आहे नांदताना भूवरी!

रोज माथा ठेवतो मी जागताना भूवरी!


स्वच्छतेचा मंत्र जपतो रम्य भूमी पाहता

वृक्षवल्ली, धुंद सृष्टी, पाहताना भूवरी!


बांधण्या घर वृक्षतोडी, कापतो का काळजा?

भान राखू, लोभ सोडू,  राहताना भूवरी!


शांततेचे वेड आम्हा; दुष्ट लोकां घालवू

देशभक्ती गात जाऊ, राबताना भूवरी!


भक्तिवेडे भक्त जेथे सज्ज त्यांच्या स्वागता

स्वार्थ त्यागू, मैत्र जोडू, चालताना भूवरी!

....................................................

सुधाकर झिंगाडे, उमरगा

8799923298