गझल : सौ. पुष्पा नं. पोरे

 



किती शांत वाहे नदीचा किनारा,

मला दे सहारा...मला दे सहारा


पहाटे पहाटे अशा रम्य वेळी

तुझ्या ओढणीचा जरा दे इशारा


तुझ्या काळजाचा झरा अंतरी हा,

जरा छेडला मी ऋतूंचा पहारा


मलाही कळाला तुलाही कळाला 

सहाही ऋतूंचा दिसे हा नजारा


कळावी मला का तुझी देहबोली,

तुझ्या यौवनाने जळे जीव सारा


कसे काय झाले, सुगंधात न्हाले

सकाळी सकाळी सुटे पुष्पवारा


................................................

सौ. पुष्पा नंदकिशोर पोरे,

संतोष नगर,

वॉर्ड नं.१७

मूर्तिजापूर

जि.अकोला


No comments:

Post a Comment