१.
प्रत्येकाचे हेच खरे रडगाणे, मित्रा!
जपून वापर हातामधले नाणे, मित्रा!
नशिबाला मग दोष देउनी काय फायदा?
कर्तृत्वाने मिळवुन असते खाणे, मित्रा!
बोलविले तर रुजू नोकरी करणे आहे
असो पुणे वा शहर असो ते ठाणे, मित्रा!
''तू घरच्यांच्या छातीवरती बसून खातो"
बेरोजगार ऐकत असतो ताणे मित्रा!
अखेरचा मग श्वास मोजला तेव्हा कळले
जीवाचे या असेच येणे-जाणे,मित्रा!
२.
पंचशीलाने सिद्ध झालो
तेवढ्याने मी बुद्ध झालो
रक्तपाताला 'मी' च कारण
जीवघेणे ते युद्ध झालो
मंत्र जापाने 'तत्त्वमसि'च्या
मी भुमेश्वर मग खुद्द झालो
'माय मी घेतो, बाप तू घे..!'
भांडती पोरं, वृद्ध झालो
ज्ञानगंगेचे तीर्थ निर्मळ
नित्य प्राशीले,शुद्ध झालो
................................
प्रवीण सु.चांदोरे (सुधांशु)
नेर परसोपंत जि.यवतमाळ
मो.9423663869
No comments:
Post a Comment