१.
काळजाला जाळतो मी
माणसे सांभाळतो मी
दुःख आहे भोवतीला
तेच तर कुरवाळतो मी
वेदना ह्या सोबतीला
वेदनांना पाळतो मी
हर्ष होतो भेटताना
पण तिलाही टाळतो मी
उंबऱ्यातच सुख उभे पण
दुःख ते न्याहाळतो मी
भांडते ती रोज आता
का तिच्यावर भाळतो मी
सोडल्यावर साथ आता
आसवे ना गाळतो मी
२.
मी कधी होतो खास कुणासाठी ?
बाळगावे हे भास कुणासाठी ?
कोण होती ती प्रश्न अता पडला
आजवर जपले श्वास कुणासाठी ?
थांबलो का मी आस कशाची ही ?
घेतला हा मी ध्यास कुणासाठी ?
पाश प्रेमाचे प्राण तिच्या हाती
रेशमी हा बघ फास कुणासाठी ?
कागदावर कोऱ्याच सही केली
एवढा हा विश्वास कुणासाठी ?
मोह सारा हा त्याग जरा आता
काढला तू हा घास कुणासाठी ?
भोगले तूही भोग दिलेले जर
हा नव्याने वनवास कुणासाठी ?
३.
आयुष्याची होळी करणे सोपे नसते
प्रेमासाठी सहजच मरणे सोपे नसते
लग्नाची हो मुलगी झाली घटिका आली
थांबवणे डोळ्यांचे झरणे सोपे नसते
तू जिंकावी यासाठी तर माझे हरणे
यश हाती असताना हरणे सोपे नसते
अर्ध्या वाटेसाठी केवळ सोबत होती
अर्धे जीवन मग सावरणे सोपे नसते
जगलो येथे नातीगोती सांभाळत मी
जाताना माया आवरणे सोपे नसते
अपमानाचे जगणे माझे सोसत असतो
दाराशी हसतच अवतरणे सोपे नसते
जगणे व्हावे दुसऱ्यासाठी मंतरलेले
आयुष्याला ह्या मंतरणे सोपे नसते
...................................................
बाळू श्रीराम,
शिरपूर (धुळे )
9011970073
बाळू श्रीराम सर. अभिनंदन.
ReplyDeleteआपल्या गझला मन लावून वाचल्या.
आवडल्या. मनाशी बोलल्या. 👍
धन्यवाद सर. आपला अभिप्राय प्रेरणादायी आहे. 🙏🙏
ReplyDeleteखुप छान गझला सर प्रेरणादायी👌👌💐💐❤️❤️
ReplyDelete🙏🙏
ReplyDeleteतिसरी गझल सर्वात चांगली वाटली.
ReplyDeleteधन्यवाद सर, मलाही तीच गझल आवडते. 🙏
Deleteजगणे व्हावे दुसऱ्या साठी मंतरलेले
ReplyDeleteआयुष्याला या मैतरणे सोपे नसते....
बाळू श्रीराम सर...
यातुन आपण आपल्या आयुष्याची वास्तविकता जणु प्रकट केली आहे असे वाटते
सर्वच गझल अप्रीतम...
धन्यवाद मित्रा 🙏
Deleteआयुष्याची होळी करणे .....
ReplyDeleteफारच सुंदर!
धन्यवाद बनसोडे सर 🙏
Delete