गझल : साै.शशिकला बनकर

 




तुझ्या आठवांचा असावा पहारा

मला वाटतो हा फुलांचा पसारा 


हसावे खळीने जरा लाजताना 

कळाला मनाला गुलाबी इशारा 


तुझी भेट व्हावी मनाच्या महाली 

मला धीर देतो सुगंधी शहारा


मिठीचा तुझ्या मोह मज आवरेना 

तुझे श्वासही अत्तराचा फवारा 


किती वाट पाहू अता धीर गेला 

भयाने भडकला मनाचा किनारा 


कळाले तुलाही, कळाले मलाही 

मनाला मनाचा सतावे दरारा 


तुझा तोल गेला, गुन्हा हा वयाचा 

हवा आज वाटे मिठीचा उबारा 

....................................................

No comments:

Post a Comment